आमची माहिती

 

नमस्कार,

‘e यशस्वी उद्योजक’ हे deAsra फाउंडेशनचं डिजिटल व्यासपीठ आहे. समाजात उद्योजकता वाढावी, उद्योग, व्यवसायाबद्दल तरूणांमध्ये आवड निर्माण व्हावी हे आमचं उद्दीष्ट आहे. 2015पासून ‘यशस्वी उद्योजक’ हे मासिक प्रिंट स्वरूपात उपलब्ध होते. बदलती परिस्थिती आणि लोकांचा डिजिटलकडे वाढत असलेला कल लक्षात घेता हे मासिक आता डिजिटल करण्यात आलं आहे.

न्यूजलेटर

‘e यशस्वी उद्योजक’ सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. त्याच बरोबर ‘e यशस्वी उद्योजक’ न्यूजलेटरच्या माध्यमातूनही Email व्दारे सगळ्यांना पाठवण्यात येते. बुधवार, शनिवार आणि रविवार असे आढवड्यातून तीन दिवस   ‘e यशस्वी उद्योजक’ पाठवलं जातं.

यात यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा, स्टार्टअप्स, बँक – वित्त संस्थांच्या विविध योजना, उद्योग व्यवसायाची नवनवीन क्षेत्रे, सरकारी योजना, स्वयंरोजगार सुरु करताना येणाऱ्या अडचणी, नव्या संधी असं सर्व काही आहे. ज्यांना काही नवं करण्याची, उभारण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ‘e यशस्वी उद्योजक’ नक्कीच मित्र ठरेल.

Subscription Box मध्ये Email दिल्यास ‘e यशस्वी उद्योजक’ तुम्हाला नियमित मिळेल.

‘e यशस्वी उद्योजक’ – संपादक मंडळ

  • आनंद अवधानी
  • सुहास कुलकर्णी
  • प्रज्ञा गोडबोले
  • अजय कौटिकवार
  • वृषाली जोगळेकर

Registrar of Newspapers for India – MAHMAR/2015/61654. Publishing at Pune District