Ask Anand: छोट्या व्यावसायिकांनी कर्ज कसं मिळवायचं? भांडवल कसं उभारायचं?

Ask Anand: छोट्या व्यावसायिकांनी कर्ज कसं मिळवायचं? भांडवल कसं उभारायचं?

छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज किंवा फंड मिळवणं हे खूप कठिण काम असतं. बँका लवकर कर्ज देत नाहीत त्यामुळे अनेकदा सावकारांकडून महागडं कर्ज काढावं लागतं. छोट्या उद्योगांसाठी भांडवल उभारण्याचे कुठले मार्ग आहेत. त्यांनी नेमकं काय करायला हवं? विश्वजित मुंडे, औरंगाबाद

प्रिय विश्वजित,

तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. छोट्या व्यावसायिकांना ज्या अनेक अडचणी असतात, त्यात महत्त्वाची अडचण असते ती पैशांची. सगळी गणितं सोडवणं सोपं असतं, मात्र पैशाचं गणित सोडवणं हे सर्वात कठीण काम असं म्हटलं जातं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, अनेक गोष्टी अवघड असतील पण अशक्य नाहीत. deAsra फाउंडेशन अशाच गोष्टींसाठी छोट्या उद्योजकांना मदत करतं.

उद्योजकाची मानसिक स्थितीही या काळात वेगळ्या प्रकारची असते. त्या सगळ्यांचा विचार करत पैसे कसे उभे करता येतील याचा आपण टप्प्या टप्प्याने विचार करू. सगळ्यात पहिले म्हणजे, आपण काय करणार आहोत, पुढे कसं जाणार आहोत याचा प्लान तुमच्याकडे तयार पाहिजे. तुमच्यातला ठामपणा, स्पष्टता, तळमळ, व्यवसायाबद्दलची पॅशन आणि कष्टाची तयारी या गोष्टी दिसून आल्यात तर मोठं काम सोपं होईल.

सुरूवात करताना बँकेकडे जाण्याआधी एक गोष्ट तुम्ही आवर्जुन केली पाहिजे. तुमचा व्यवसायाची आयडिया तुम्ही तुमच्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना किंवा इतर परिचितांना पहिल्यांदा सांगा. यावेळी वर सांगितलेली सर्व कौशल्ये वापरा, त्या गोष्टी तुमच्यात दिसल्यात तर त्यापैकी कुणी तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवण्यास तयार होऊ शकते.

या प्रश्नांची उत्तरं वाचलीत का?

त्यानंतर पर्याय आहे तो विविध बँकांचा. छोट्या व्यावसायिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी पब्लिक सेक्टर बँका, सहकारी बँका, एनबीएफसी, फिन टेक कंपनीज यांच्या विविध कर्ज योजना उपलब्ध असतात. ग्रामीण भागात अनेक पतपेढ्याही अशा प्रकारची कर्ज देत असतात. त्याच बरोबर सरकारच्या विविध योजना, उपक्रम, महामंडळं यांच्याकडेही फंड असतो, त्यावर अनुदानही दिलं जातं. त्याचाही विचार तुम्ही केला पाहिजे.

deAsra फाउंडेशनने छोट्या व्यावसायिकांचा बारकाईने अभ्यास करून, त्यांना बँकांकडून कर्ज मिळवून दिलं आहे. अशा प्रकारचं कर्ज मिळाल्यामुळे त्यांनी सावकाराचं महागडं कर्ज परत केल्याच्याही घटना आहेत. तसेच छोट्या व्यवसायिकांना सरकारी कर्ज योजनेंतर्गत सबसिडीचाही लाभ मिळवून दिला आहे. प्रत्येक छोटा व्यवसायिक, त्याचे प्रोडक्ट्स, व इतर गोष्टी लक्षात घेऊन SWOT Analysis केले जाते व व त्याला कर्ज मिळवून देण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन deAsra फाउंडेशन करत असतं.

व्यवसायासाठी लागणारा पैसे हे दोन प्रकारचे असतात. एक असतं भाग भांडवल व दुसरं असतं कर्ज रूपाने पैसा उभा करणे. छोट्या व्यवसायिकांना कर्जरूपाने पैसे उपलब्ध करून देण्यास deAsra फाउंडेशन मार्गदर्शन करते. आपण त्याचा लाभ घेऊ शकता.

कर्ज मिळवायचं असेल तर छोट्या व्यावसायिकांनी या 5 गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

  1. सर्व कागदपत्रांसहीत तयार असलेला बिझनेस प्लान –

यात तुमच्या प्रॉडक्ट्स आणि सेवांची ओळख आणि दर्जाची खात्री असावी. मार्केटची क्षमता, असलेली स्पर्धा, कंपनी आणि त्यांच्या सदस्यांची माहिती, अपेक्षीत खर्च, अपेक्षीत नफा अशा काही गोष्टींबाबत थोडक्यात पण नीट मांडणी केलेली असावी.

  1. व्यवसायाची क्षमता –

व्यवसाय दीर्घकाळ चालणारा आणि टीकावू आहे, अनेक चढ-उचारांमध्ये तो टिकाव धरू शकेल हे दिसायला हवं.

  1. कॅशफ्लो-

कॅशफ्लो मॅनेजमेंट आणि त्याबाबतची स्पष्टता असणं खूप गरजेचं आहे. त्याची माहिती करून घ्या.

4.  ग्राहक केंद्रबिंदू –

व्यवसायात ग्राहक हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्याशी नातं जोडू शकणारी योजना हवी आणि मनातून इच्छाही.

5. व्यवस्थापन –

व्यवसायासाठी लागणाऱ्या परवाने, लायसन्ससेस, हिशेबाची चोख व्यवस्था आणि त्याचं पालन, टॅक्स आणि त्याचे बारकावे याची माहिती.

deAsra फाउंडेशनच्या यासंदर्भातल्या कार्यक्रमांच्या काही Links

Business Loan Readiness Program

https://bit.ly/3rD5q71

Business Loan Readiness Program

https://bit.ly/3tGqdJl

Dr Jyoti Gogte FB Live Secrets of Small business loan

https://bit.ly/3rBkhyQ

Understanding Government Initiatives & Schemes for MSMEs

https://bit.ly/3tFF7zL

छोट्या उद्योगांना कर्ज न मिळण्यास ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा deAsra फाउंडेशनने अभ्यास केला होता. त्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, छोट्या व्यावसायिकांकडे योग्य कागदपत्रांचा अभाव असणं आणि बँकेचा स्कोअर चांगला नसणं. त्यामुळे आपल्याकडे सर्व कागदपत्र नीट असतील याची काळजी घ्या आणि बँकेचे व्यवहार चोख होतील आणि आपला स्कोअर चांगला राहिल याची काळजी घ्या.

All the Best!

आनंद

@anandesh

https://www.linkedin.com/in/ananddeshpande

 

 

  प्रत्येक उद्योजकाला त्याच्या उद्योगामध्ये त्याने विक्री करताना किंवा...

  “मी काय बावळट आहे का अशिक्षित आहे?” नंदिताच्या डोळ्यांत राग होता. नंदिता...

परवा माझ्याकडे एकजण आले होते. बोलता बोलता एका मोठ्या रेस्टॉरन्टबद्दल एकदम ...

उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप सुरू करायचं असेल तर पहिला प्रश्न असतो तो भांडवला...

व्यवसायात अडचणी, आव्हाने येणारच नाहीत हे शक्यच नाही. पण त्या आव्हानांचा मुक...