कॉर्पोरेटची नोकरी सोडून व्यवसाय, Startupsच्या मदतीसाठी उभारलं नेटवर्क

कॉर्पोरेटची नोकरी सोडून व्यवसाय, Startupsच्या मदतीसाठी उभारलं नेटवर्क

एका बहुराष्ट्रीय कंपनीतली चांगल्या पगाराची नोकरी सोडून, एका परदेशी कंपनीच्या उत्पादनांचं नेटवर्क मार्केटिंग, त्यानंतर चक्क स्टेशनरी आणि झेरॉक्सचं दुकान टाकून व्यवसाय त्यातून पुढे दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची एजन्सी असे एकमेकांशी सुतराम संबंध नसलेले 6-7 वेगवेगळे व्यवसाय गेल्या दहा वर्षांत यतीनने केले. अपार कष्ट करून या प्रत्येक व्यवसायात पाय रोवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला चरितार्थ चालवण्याइतके जेमतेम उत्पन्न मिळालेही, पण नोकरी केल्यावर त्याला मिळणारा पगार, त्या तुलनेत पडणारे कष्ट, द्यावा लागणारा वेळ, गुंतवलेले भांडवल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली नोकरी सोडून व्यवसायात पडल्याबद्दल नातेवाईकांकडून येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया यामुळे तो अक्षरश: भंजाळून गेला होता. आता परत नोकरीचा विचार करणंही त्याला शक्य नव्हतं. आणि म्हणूनच आपल्यापेक्षा यशस्वी ठरलेले उद्योजक नक्की काय करतात, आपलं काय चुकतय हे तपासण्याची गरज त्याला वाटू लागली होती. याच दरम्यान त्याला J4E (जस्ट फॉर आंत्रप्रिन्यूअर) या व्यावसायिकांसाठीच्या उपक्रमाची माहिती मिळाली आणि त्याच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्याला गवसली.

 

J4E: व्यावसायिकांचं जाळं निर्माण करणारी कंपनी 

यतीनसारखे अनेक तरुण हल्ली स्वत:चं स्टार्ट अप सुरू करतात. पण व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसल्याने अनेक चुका त्यांच्याकडून होतात, त्या चुका सुधारताना खूप आर्थिक नुकसान होतं, वेळ वाया जातो आणि मानसिकदृष्ट्या खचायला होतं. पण समव्यावसायिकांचे अनुभव समजून घेतले, त्यांचा सल्ला घेतला, आपल्या क्षेत्रातले योग्य संपर्क मिळाले तर यातल्या बर्‍याच चुका टाळून, व्यवसाय वृद्धी लवकर करता येऊ शकते. हे स्वानुभवातून लक्षात आल्यावर इतर व्यवसायिकांनाही या गोष्टीचा फायदा व्हावा, या उद्देशाने पुण्यातील विशाल मेठी या तरुणाने दोन वर्षांपूर्वी J4E (जस्ट फॉर आंत्रप्रिन्यूअर) ही व्यावसायिकांचं जाळं निर्माण करणारी एक स्टार्ट अप कंपनी सुरू केली. 

 

What’s App ग्रुपद्वारे व्यवसाय वृद्धीसाठी शिफारशी आणि मार्गदर्शन  

याअंतर्गत विनाशुल्क आणि सशुल्क असे दोन प्रकारचे What’s App ग्रुप विशाल यांनी बनवले आहेत. विनाशुल्क ग्रुपमध्ये 3500 सदस्य आहेत. तर सशुल्क ग्रुपमध्ये 125 सदस्य आहेत. वार्षिक दहा हजार रूपये या ग्रुपचं सदस्य शुल्क आहे. पण कोविड काळात हे शुल्क दोन वर्षांसाठी आकारण्यात आलं. या ग्रुपमधले 35-45 सदस्य प्रत्येक आठवड्यातल्या मंगळवार, बुधवार, गुरूवारी एकत्र भेटतात. त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात J4E तर्फे व्यवसाय वृद्धीसाठी WhatsApp ग्रुपद्वारे शिफारशी पाठवल्या जातात, मार्गदर्शन केलं जातं. कुठल्याही व्यवसायासाठी आवश्यक असलेली आंत्रप्रिन्यूअरशिप (उद्योजकता), लीडरशिप (नेतृत्व) आणि मॅनेजमेंट (व्यवस्थापन) ही तिन्ही कौशल्य वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन दिलं जातं. सध्याच्या कोविडच्या अनिश्चिततेच्या काळात जसं शक्य असेल तसं ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष कार्यक्रम घेतला जातो. ज्यात वेगवेगळे व्यावसायिक एकमेकांच्या व्यवसायांविषयी माहिती समजून घेतात. एकमेकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या संपर्कांची (कनेक्शन्सची), लीड आणि संधीची गरज आहे, त्यावर चर्चा आणि देवाणघेवाण केली जाते. त्यातून उत्पन्न वाढायला मदत होते. 

 

फ्री WhatsApp ग्रुपवर पण संपर्क, व्यवसायाच्या संधींची देवाण-घेवाण होते. अनेकांगानी त्याचा फायदा व्यावसायिकांना होतो. फ्री WhatsApp ग्रुपचे सदस्य सगळे विनाशुल्क कार्यक्रम आणि वर्षातून तीन संपर्क बैठकांना (नेटवर्किंग मीटिंग) उपस्थित राहू शकतात. J4E चे सदस्यत्व घेतल्यास या व्यावसायिकांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो.   

 

एकीकडे उभरत्या स्टार्टअपना मदत करून त्यातून स्वत:च्या व्यवसायाची संधी विशाल यांनी कशी शोधली हे समजून घेणं फार रोचक आहे. विशाल यांनी आपल्या करिअरची सुरूवात एका मोठ्या आय. टी. कंपनीतल्या नोकरीपासून केली. काही वर्ष नोकरी केल्यावर त्यांनी स्वत :चा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. सुरूवातीला त्यांनी  एका कंपनीला घरोघरी जाऊन सुतारकाम ,प्लंबिंग, स्वच्छता अशी विविध कामं करणारे कर्मचारी पुरवण्याचं काम केलं. त्यानंतर काही काळ इन्शुरन्स एजंट म्हणून काम केलं, भाजी आणि फळं विक्रीचाही व्यवसाय करून बघितला. डिस्काउंट व्हॉवचर बुकलेट प्रिंट करून सर्क्युलेट केलं. अशा प्रकारे 7-8 प्रकारचे व्यवसाय त्यांनी केले.  पण हे सगळे व्यवसाय एका मर्यादेच्या पुढे ते वाढवू शकले नाहीत. हे असं का होतंय यावर खूप विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारं पोषक वातावरण आपल्या देशात नाहीये. एखाद्या व्यवसायिकाने स्टार्टअप सुरू केलं तर त्याला मार्गदर्शन मिळेल, व्यवसाय वृद्धीसाठी काही कल्पना,योग्य संपर्क मिळतील असा एकही फ्लॅटफॉर्म उपलब्ध नाहीये. आपल्या काही समव्यावसायिकांशी ते यावर चर्चा करत असत.

    

उद्देश एकच असल्याने ‘deAsra’बरोबर समन्वय

त्या दिवसांविषयी बोलताना विशाल म्हणतात “त्याकाळी वेगवेगळे स्टार्ट अप असलेल्या तीन-चार जणांचा आमचा एक ग्रुप होता, आम्ही वारंवार भेटत होतो आणि व्यवसायिकांना मार्गदर्शन मिळेल असा फ्लॅटफॉर्म तयार करण्याच्या कल्पनेवर चर्चा करत होतो. ही चर्चा सुरू असताना मी त्या कल्पनेत खोलवर गुंतत गेलो. इतर लोक याबाबतीत तेवढे आग्रही नव्हते, पण मला मात्र असा फ्लॅटफॉर्म अस्तित्वात यावा अशी तीव्र इच्छा होती आणि त्या इच्छेमधूनच या व्यवसायाचा जन्म झाला. यापूर्वीही परसिस्टंट सिस्टिम्स लि. कंपनीच्या deAsra च्या टीमबरोबर माझे संबंध होतेच. त्या दरम्यानच्या काळात दे आसराचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांच्याबरोबर माझी भेट झाली. त्यांच्याशी याबाबतीत बोलल्यावर त्यांनाही ही कल्पना आवडली. तेव्हापासून मग deAsra बरोबरचे माझे संबंध जास्त दृढ व्हायला लागले.  कोव्हीडच्या काळात ‘deAsra ’ बर्‍याच स्टार्ट अपना विविध पध्दतीने मदत करण्याचा प्रयत्न करत होतं. त्याचवेळी आम्ही पण J4E च्या आमच्या सदस्यांना काय मदत करता येईल हे बघत होतो. दोघांचा उद्देश एकच असल्याने आमचं असोसिएशन चांगल्या प्रकारे तयार झालं. आता आम्ही असोशिएट पार्टनर आहोत”. 

 

deAsra च्या परफॉरमन्स मॅनेजमेंट टूल, बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्रॅमचा फायदा 

‘deAsra ’शी समन्वय साधल्यामुळे अनेक फायदे J4E च्या सदस्यांना झाले आहेत.  deAsra चं जे परफॉरमन्स मॅनेजमेंट टूल आहे ते खूप वेगळं आणि युनिक आहे. ज्यातून स्टार्ट अपना ते कोणत्या पातळीवर आहेत, त्यांच्या काय चुका होताहेत, काय बरोबर आहे हे कळतं. त्यांची ताकद आणि कमजोरी काय हे देखील समजतं. आमच्या कित्येक स्टार्ट अपनी ते वापरले आहेत. deAsra च्या बिझनेस लोन रेडीनेस प्रोग्रॅमद्वारेही व्यावसायिकांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. स्टार्ट अपनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ज्यातून त्यांना भविष्यात फंडिंग मिळू शकेल याचा  अंदाज येतो. सोशल मीडियावरच्या त्यांच्या ट्रेनिंग प्रोग्रॅमामुळे सोशल मीडिया  फ्लॅटफॉर्म परिणामकारकरित्या कशाप्रकारे वापरता येईल हे कळतं . कंपलायन्सेस (अनुपालन ) साठी ज्या व्यवसायिकांनी  deAsra ची  मदत घेतली होती, त्यांना अत्यल्प किंमतीत कंपलायन्सेस मिळाले. गेली दोन वर्षं J4E ‘deAsra ’बरोबर हातात हात घालून काम  काम करत आहे. deAsra चे इव्हेंट्स असतील तर त्यांची माहिती J4E सदस्यांना ते कळवतात. J4E चे इव्हेंटस असतील तर deAsra ची टीम त्यांना सपोर्ट करते. 

 

वाढ कशी करायची याची दृष्टी मिळते

आपल्याकडे  स्टार्ट अप सेक्टर खूप विस्कळीत आहे त्याबद्दल दूरदृष्टीचा अभाव आहे, त्यांच्यापुढे काही विशिष्ट ध्येय नसतं, कंपलायन्सेस कसे करायचे याचा विचार नसतो. योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे आव्हानांना कसं सामोरं जायचं हे त्यांना माहीत नसतं. त्यामुळे अपेक्षीत जोमाने त्यांची वाढ होऊ शकत नाही. deAsra या सगळ्यासाठी नव व्यावसायिकांना मदत करतं. त्यामुळे वाढ कशी करायची याची दृष्टी त्यांना मिळते. उपजीविकेसाठी व्यवसाय करताना अनेक मूलभूत गोष्टींकडे व्यावसायिकांचं दुर्लक्ष होतं, पण deAsra या सगळ्या गोष्टींबाबत त्यांना मार्गदर्शन करतं.  व्यवसाय वृद्धीसाठी या सगळ्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. 

 

ग्राहकांच्या फायद्याचा विचार केल्यास व्यवसाय वृद्धीची शक्यता जास्त   

विशाल म्हणतात  “बहुतेक वेळेला स्टार्ट अप  सुरू करणाऱ्या व्यक्तीला नक्की  काय करायचं, कसं करायचं याबाबत कल्पना नसते. सुरूवातीचा प्रवास नेहमीच खूप अवघड आणि आव्हानात्मक असतो. माझ्याबाबतीतही अशीच परिस्थिती होती. आम्ही इव्हेंट्स वैगेरे आयोजित करत होतो, पण एकूणच काय करायचं याबाबतात स्पष्टता नव्हती. दे आसराचे संचालक आणि माझे मार्गदर्शक डॉ. आनंद देशपांडे आणि  मनोज लेखी यांच्यांशी चर्चा केल्यावर अनेक गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या. त्यानंतरच  नक्की  कशी  पावलं  टाकायची हे मला कळालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला आनंद देशपांडे यांच्याकडून कळली ती म्हणजे व्यवसायात आपलं  साध्य काय असंल पाहीजे हे व्यावसायिकांना माहीत असायला हवं. काय प्रकारच्या सेवा तुम्ही ग्राहकांना देता आहात, त्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे याबाबत त्यांना स्पष्टता असायला हवी. एक गोष्ट ते आवर्जून सांगतात ती म्हणजे ‘ग्राहकांच्या फायद्याचा विचार करा. कारण ते सामाधानी, आनंदी असतील तर व्यवसाय वृद्धीची शक्यता खूप जास्त असते’. दे आसराच्या मार्गदर्शनाखाली विशाल यांची वाटचाल जोमाने सुरू आहे. कोरोना काळातही त्यांची वाढलेली सदस्य संख्या हे त्याचं त्याचंच निदर्शक आहे. 

 

J4E विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी स्टार्ट अप J4E च्या लीडरशिप टीम मेंबर वासंती मिलाजकर (भ्र .क्र. 9423347565 ) किंवा प्रीति (भ्र .क्र. 9356996270) यांच्याशी संपर्क करू शकता.

 

https://chat.whatsapp.com/JGqI4m15F9E72Mcw5wYEA4 या लिंक द्वारे स्टार्ट अप J4E च्या व्हॉट्स अप ग्रुपला जोडले जाऊ शकतात.                                                      

                                                           – मृणालिनी ठिपसे

  उद्योजकतेचा ध्यास असणारे फक्त शहरातच असतात का? नक्कीच नाही. खरे तर शहरात...

  लहानपणच्या शाळेतल्या आठवणींचा एक हळुवार कप्पा प्रत्येकाच्याच मनात अस...

  शेतकरी असो वा कोणताही उद्योजक, वेगळा विचार करणारा, काही धाडस करणारा यशस्...

  विवेक वसंतराव जाधव यांचे मूळ गाव चाकण असले तरी ते स्वतः मुंबईकरच. फायनान...

  चित्रं, त्यातल्या आकृत्या, साजरे रंग यांच्याशी माणसाची बांधिलकी असते. क...