डॉ. आनंद देशपांडे, सौ. सोनाली देशपांडे, रिया देशपांडे, अरुल देशपांडे .

नमस्कार,

Card List Article

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वेगळेपण निर्माण केलेल्या 'पर्सिस्टंट सिस्टम्स ' चे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी आपल्या कौटुंबिक उत्पन्नातून ' दे आसरा फाउंडेशन ' हा महत्वाकांक्षी प्रकल्प फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु केला. युवक वर्गाने नोकरीसाठी हात न पसरता उद्योग / व्यवसायाचा राजमार्ग स्वीकारावा, ह्यासाठी दे आसरा फाऊंडेशन 'ही ना नफा तत्वावरची पब्लिक लिमिटेड कंपनी उभारली आहे. याच उद्देशासाठी ' यशस्वी उद्योजक ' हे मराठी मासिक फेब्रुवारी २०१५ पासून प्रकाशीत करण्यात येत आहे. आम्ही या मासिकाच्या माध्यमातून उद्योग / व्यवसायाविषयीची माहिती अत्यंत सोप्या भाषेतून सर्वांपर्यंत आणत आहोत. यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा, बँक – वित्त संस्थांच्या विविध योजना, उद्योग व्यवसायाची नवनवीन क्षेत्रे, सरकारी योजना, स्वयंरोजगार सुरु करताना येणाऱ्या विविध अडचणी, उद्योगाच्या नवनवीन संधी या सारख्या अनेक विषयांचा समावेश मासिकामध्ये केला जातो.