21 व्या शतकात भारत विज्ञान, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि स्टार्ट-अप या क्षेत्रात जोमाने प्रगती करत आहे. देश विकासाची नवीन उंची गाठत असताना बेरोजगारीचा प्रश्न मात्र अजुनही सुटलेला नाही, तर तो जास्त जटील बनतो आहे. भारत दरवर्षी 12 दशलक्ष रोजगारक्षम तरुण तयार होतात. पण या तरुणांना रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.
तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात, नोकरे मागणारे हे नोकरी देणारे बनावेत, व्यवसायात प्रगती करू इच्छिणाऱ्यांसाठी एक इकोसिस्टिम निर्माण व्हावी याच उद्देश आणि ध्येयाने पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि एमडी डॉ. आनंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सोनाली यांनी 2015 मध्ये deAsra फाउंडेशनची स्थापना केली. deAsra फाउंडेशन ही ना नफा तत्वावर चालणारी (Section 8) संस्था आहे.
deAsra फाउंडेशन व्यवसाय सुरू करण्यापासून ते असलेला व्यवसाय वाढवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यांवर मदत करते. deAsra फाउंडेशनच्या सर्व सेवा डिजिटल रूपात उपलब्ध आहेत. ग्राहकानुकूल तत्पर सेवा, उत्कृष्ट दर्जा, अनुभवी तज्ज्ञ सल्लागार, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर यामुळे deAsra फाउंडेशनने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.